Divorce case in India:भारतात सध्या घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे अगदी १० लग्नं झाली, तर त्यातील ३ घटस्फोट होतात. अगदी अभिनेते-सेलेब्रिटी लोकं यांचे तर सहज रित्या घटस्फोट झाल्याच्या चर्चा होतात. सामान्य कुटुंबापासून ते मोठ्या कुटुंबापर्यंत घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का, पहिला घटस्फोट कधी झाला? किंवा महिलांसाठीचा हक्क कायदे कधी सुरु झाले माहीत आहेत का? जाणून घेऊया…
डॉ. रुखमाबाई राऊत या भारतातील स्त्रीवादी चळवळींचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या कायदेशीररित्या घटस्फोट घेणाऱ्या पहिल्या हिंदू महिला ठरल्या, तसेच पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकून डॉक्टर होणाऱ्या पहिल्या भारतीय महिलांपैकीही त्या एक आहेत.
बालवयात दादाजी भिकाजी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. परंतु, त्यांनी उच्च शिक्षणासाठी माहेरी राहिल्या. आणि नंतर त्यांनी पतीसोबत राहण्यास नकार दिला. १८८५ मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. त्यांना नवऱ्यासह रहा नाहीतर तुरुंगवास भोगावा लागेल, असं न्यायालयाने सांगितलं. त्यांनी तुरुंगवास पत्करण्याची तयारी दाखवून त्यांनी पितृसत्ताक प्रथांना आव्हान दिले. या खटल्यामुळेच १८९१ मध्ये संमती वय कायदा लागू झाला आणि बालविवाहाविरोधी चळवळीस नवे बळ मिळाले.
पत्रकारितेद्वारेही त्यांनी स्त्रियांच्या हक्कांबाबत ठाम आवाज उठवला. त्यांच्या विचारांना अनेक समाजसुधारकांचा पाठिंबा मिळाला आणि अखेरीस राणी व्हिक्टोरियाने हस्तक्षेप करून विवाह रुखमाबाईंना स्वातंत्र्य दिले.
यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर विमेन येथे वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आणि भारतात परत येऊन समाजसेवेच्या भावनेने डॉक्टर म्हणून काम केले.
रुखमाबाई राऊत यांचे जीवन हे धैर्य, शिक्षणाची ताकद आणि स्त्रीस्वातंत्र्याचे प्रतीक आहे. त्यांनी उभारलेला लढा हा भारतातील स्त्रीमुक्तीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
