Asia Cup 2025 च्या अंतिम सामन्यात (Ind Vs Pak) भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत एकतर्फी विजय मिळवला. भारताचा विजय आणि त्यानंतर मैदानावर घडलेला अविस्मरणीय प्रसंग यामुळे पाकिस्तानी संघावर आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. आता पाकिस्तानचाच माजी खेळाडू शोएब अख्तर याने देखील पाकिस्तान क्रिकेटबोर्डाबर हल्लाबोल केला आहे.
शोएब अख्तर याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व त्याच्या व्यवस्थापनेची चांगलीच कानउघडणी केली आहे. अख्तर म्हणाला, ” क्रिकेट बोर्डाला आता कतृत्ववान खेळाडूंपेक्षा आज्ञाधारक खेळाडू हवे आहे. ताकदवान आणि स्वतंत्र विचाराच्या खेळाडूंना आता संघात स्थान दिले जात नाही. जे रात्री आठ वाजता घरी जाऊन बसतील, अशांनाच स्थान दिले जाते. या मानसिकतेमुळेच संघात कधी नेतृत्वगुण असलेले खेळाडू तयार होणार नाहित.
आशिया कपमधील पाकिस्तानच्या पराभवाला अख्तरने निवड समिती, नेतृत्व आणि रणनीतीला जबाबदार धरलं आहे. तो म्हणाला संघाचं नियोजन चुकीच होत, कर्णधार योग्य निर्णय घेऊ शकत नव्हता कारण व्यवस्थापन पूर्णपणे अकार्यक्षम आहे.” पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावरही त्याने रोष व्यक्त केला आहे. हे प्रशासनचं मूर्ख असल्याचे त्याने म्हटले. खेळाडूंची अयोग्य निवड, कर्णधार आणि खेळाडूंमधला समन्वय यामुळे वर्षानुवर्ष संघ सामने हरत आहे, आणि हे चुकीच्या व्यवस्थापनाचं फळ आहे, अशी टीका त्याने केली आहे.
