दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचा झगमगाट; दर पोहोचले ऐतिहासिक पातळीवर

Lifestyle News

हिंदू संस्कृतीत दसरा हा केवळ सण नसून शुभारंभाचा दिवस मानला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. रामाने रावणाचा पराभव करून मिळवलेला विजय, किंवा पांडवांनी अज्ञातवास संपल्यावर शमीच्या झाडाखाली ठेवलेली अस्त्रं पुन्हा हाती घेतल्याची कथा, या सर्व कथा दसऱ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.

या दिवशी घरात नवे वाहन, सोनं-चांदी, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, किंवा व्यवसायासाठी लागणारी नवी साधनं खरेदी केली, तर ते यश, संपन्नता आणि श्रीमंती वाढवणारं मानलं जातं.

सोन्याच्या भावात विक्रमी वाढ

गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठेत सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. महागाई, जागतिक राजकीय तणाव, तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन, या सर्व घटकांमुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतींना मोठे उधाण आले आहे.

1 ऑक्टोबर 2025, बुधवार रोजीचे दर :

24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) – ₹1,17,620

22 कॅरेट सोने (10 ग्रॅम) – ₹1,07,818

चांदी (1 किलो) – ₹1,43,830

चांदी (10 ग्रॅम) – ₹1,438

सोनं-चांदी खरेदीचे महत्त्व
भारतीय परंपरेत सोनं हे केवळ दागिन्यांसाठीच नव्हे, तर सुरक्षित गुंतवणुकीसाठीही ओळखलं जातं. सोन्याचे भाव सतत वाढत असल्यामुळे अनेक जण सोनं खरेदी करून ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून जपतात. तर चांदी हीही धार्मिक आणि व्यावहारिक कारणांमुळे महत्त्वाची मानली जाते.

ग्राहक काय म्हणतात?
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांतील सराफा बाजारात सध्या मोठी गर्दी आहे. सोन्याचे दर उच्चांकी असले तरी लोक “मुहूर्तावर खरेदी करायलाच हवी” या भावनेतून दागिने घेताना दिसत आहेत. विशेषतः हलके वजनाचे दागिने, कॉईन आणि वळ्यांची मागणी वाढलेली आहे.

Leave a Reply