अहिंसेच्या विचारांवर हिंसक हल्ला! महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना

News

गांधी जयंतीला अवघा एक दिवस राहिलेला असतानाचा महात्मा गांधींच्या पुतळ्याची अज्ञाताने विटंबना केली आहे. गांधीजींचे पुतळे जगभरात आहेत. अशाच लंडनमधील टॅव्हिस्कॉट स्क्वेअरमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. याबाबत High Commission of india ने संताप व्यक्त केला आहे.

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हा पुतळा ध्यानमग्न अवस्थेतीतल आहे. या पुतळ्यावर कुणीतरी ग्रॅफिटी केलेली आढळली. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार नोंदवली आहे.

भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, लंडनमधील टॅव्हिस्कॉट स्क्वेअरमध्ये सोमवारी 29 सप्टेंबर 2025 मध्ये हा प्रकार घडला. यांनतर गांधी समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गांधीजींच्या अहिंसेच्या संकल्पेनेवर आणि विचारांवर हल्ला असल्याचे समर्थकांनी म्हटले आहे.

सदर पुतळा 1968 मध्ये लंडन येथील टॅव्हिस्कॉट स्क्वेअरमध्ये उभारण्यात आला होता. समर्थकांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave a Reply