Asia Cup 2025 India

Asia Cup 2025: मैदान कोणतेही असो, भारत जिंकणारच ! भारताच्या विजयावर पहा काय आल्या प्रतिक्रिया

News Sports Trending

India win asia cup 2025 final: आशिया चषकाच्या रोमहर्षक अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा पराभूत केलंय. या स्पर्धेत पाकिस्तानला भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आला नाही. एवढच नाही तर भारताने या संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. भारताने ९व्यांदा आशिया चषकावर नाव कोरलंय.

Asia Cup Trophy: करारा जवाब! भारतीय संघाचा आशिया चषक स्वीकारण्यास नकार

याशिवाय काल मैदानावर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया क्रिकेट परिषदेचे प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे ट्रॉफीशिवाय भारतीय संघाने विजयाचं केलेलं सेलिब्रेशनही बरंच चर्चेत आहे.


दरम्यान, या विजयानंतर भारतीय क्रिकेटचे चाहत्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे. देशवासियांकडून भारताच्या धुरंधर खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
त्यांनी स्पर्धेत केलेल्या अतुलनिय कामगिरीवर सर्वच स्तरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. चला जाणून घेऊयात कोण काय म्हणाले आहे.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विटरवर लिहिले की, “आशिया कप क्रिकेट स्पर्धा जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे मनापासून अभिनंदन. या स्पर्धेत संघाने एकही सामना गमावला नाही, खेळात आपले वर्चस्व कायम ठेवले. भविष्यातही टीम इंडियाने उंच भरारी घेत राहावी अशी माझी आशा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट केली. “ऑपरेशन सिंदूर असो किंवा खेळाचे मैदान निकाल एकच…. तो म्हणजे भारताचा विजय” असं लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला टोला लगावला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवर लिहिले की, “एक अद्भुत विजय. आमच्या खेळाडूच्या प्रचंड उर्जेने पुन्हा एकदा विरोधकांना पराभूत केले आहे. मैदान कोणतेही असो, भारत जिंकणारच हे निश्चित आहे.


देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही एक्सवर पोस्ट लिहिलीय, त्यांनी “#ऑपरेशनसिंदूर खेळातही… भारताने पाकिस्तानला हरवले! भारतीय संघाचे भव्य आणि ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन!” अशा शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संजय राऊत, शिवसेना खासदार
संजय राऊतांसह विरोधी पक्षाने भारताने पाकविरुद्ध खेळू नये अशी भूमिका सुरुवातीपासूनच घेतली होती. त्यानंतर आता भारताच्या विजयानंतर संजय राऊतांनी एक ट्विट केला आहे व लिहिलंय की, “१५ दिवसांपूर्वी मालिकेच्या सुरुवातीला त्यांनी पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी यांच्याबरोबर हस्तांदोलन केले आणि त्यांच्याहबरोबर फोटोही काढले. आता हे लोक देशाला एक नौटंकी दाखवत आहेत. जर तुमच्या रक्तात इतकी देशभक्ती असती तर तुम्ही पाकिस्तानबरोबर मैदानात सामीलच झाला नसता. हे सर्व वरपासून खालपर्यंत नाटक आहे. भारतातील लोक मूर्ख आहेत.

अभिनेते अनुपम खेर
लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिलीय “भारत माता की जय, ही किती अद्भुत गोष्ट आहे! मला माझ्या देशाचा अभिमान आहे” असं त्यांनी लिहिलं आहे. या व्हिडिओमध्ये ते असेही म्हणताना दिसत आहेत की त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले आहे.

Leave a Reply