सर्दी झाल्यास किंवा ताप आल्यास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारे औषध म्हणजे पॅरासिटामॉल. बहुतांश लोकांच्या घरी पॅरासिटामॉल अगदी सहज उपलब्ध असते. मात्र या पॅरासिटामॉलमध्ये अशी काही रसायने असतात ज्यामुळे ऑटीझम हा आजार होण्याची भीती असते. यामुळेच गरोदर महिलांनी पॅरासिटामॉल घ्यावी की नाही यावर संभ्रम निर्माण झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरासिटामॉलचे अधिक सेवन केल्यास यामुळे ऑटिझम होऊ शकते असे वक्तव्य केले. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर गरोदर महिलांनी पॅरासिटामॉल (Tylenol) घ्यावे की नाही यावर जगभरात चर्चा सुरू आहे. टायलेनॉल म्हणजेच अॅसिटामिनोफेन असून जगभरात ते पॅरासिटामॉल या नावाने ओळखले जाते. गरोदर महिलांनी याचे सेवन केल्यास जन्माला येणाऱ्या गर्भावर याचे काही परिणाम होतील का हा प्रश्न उद्भवतो.
पॅरासिटामॉल हे ओव्हर-द-कांउटर वेदनाशामक औषध आहे. पॅरासिटामॉल कसे काम करते याबाबत पूर्ण माहिती नसली तरी ते मेंदूतील वेदना जाणवण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतं आणि प्रोस्टॅग्लँडिन्स नावाच्या वेदनेसंबंधित घटकांची निर्मिती कमी करत. हे औषध योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचे दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ असतात. 500 ग्रॅमची एक किंवा दोन गोळ्या दिवसातून चार वेळा घेतल्यास त्याचा फारसा काही वाईट परिणाम होत नाही. मात्र त्यापेक्षा अधिक प्रमाणात डोस घेतल्यास यकृतावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
अमेरिकेच्या FDA च्या आकडेवारीनुसार, 1998-2003 दरम्यान यकृत निकामी होण्यामागे पॅरासिटामॉलचा अतिरेक प्रमुख कारण होते. केवळ पॅरासिटामॉलच नाही तर यांसारख्या अनेक औषधांमध्ये अॅसिटामिनोफेन असते. अनावधानाने रूग्ण जास्त प्रमाणात याचे सेवन करू शकतात. काही तज्ञांच्यामते अॅसिटामिनोफेनच्या वापरचा आणि ऑटिझमचा किरकोळ संबंध असला तरी त्याबाबत अद्याप ठोस पुरावे नाहित. तज्ञांच्या मते, ऑटिझम ही अनेक अनुवांशिक आणि पर्यावरणीय कारणांमुळे देखील होऊ शकतो. पॅरासिटामॉलमुळेच ऑटिझम होतो असे नाही. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांच्या मते, मर्यादित प्रमाणात पॅरासिटामॉल घेतल्यास गरोदर महिलांकरीता सुरक्षित आहे.
