I phone 17 series and I phone 18

I phone 17 घेताय? थांबा! ‘हे’ वाचा आणि ठरवा

Lifestyle News Trending

आयफोन 17 लॉन्च झाल्यावर सगळ्यांची तो घेण्यासाठी झुंबड उडाली. पहिला आयफोन 17 घेण्यासाठी लोकांनी स्पर्धाही लावली. पण आयफोन १७ घेत असाल तर थांबा. आयफोनचाच अजून एक जबरदस्त फोन लवकरच लॉन्च होणार आहे. त्याची आधी माहिती घ्या आणि मग या फोनवर पैसे खर्च करायचे की नाही ते ठरवा..

ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन 2026 मध्ये लॉंच होण्याची अपेक्षा आहे. हा फोन अत्यंत पातळ, टायटॅनियम डिझाइन आणि आयफोन 18 मालिकेसह लॉंच होईल.

Delhi Flight news : आश्चर्य! काबूलहून थेट आला दिल्लीत; अफगाणी मुलाचा विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपून प्रवास

Navaratri 2025:जगातील एकमेव सीतामाईंचे मंदिर कुठे आहे माहीत आहे का? जिथे अजूनही येते रामायणाची अनुभूती

आयफोन 18 सीरिज

ॲपल आपला पहिला फोल्डेबल आयफोन पुढील वर्षी बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी या बहुप्रतीक्षित डिव्हाइसच्या डिझाइनबाबत प्राथमिक माहिती दिली आहे. आयफोन 18 मालिकेसह सप्टेंबर 2026 मध्ये ते लॉंच होण्याची अपेक्षा आहे. गुरमन यांच्या मते, हा फोन अत्यंत पातळ आणि डिझाइन आणि उत्कृष्ट असेल.

डिझाइन
ब्लूमबर्गनुसार, ॲपलचा फोल्डेबल आयफोन हा अत्यंत पातळ डिझाइनचा असेल, जो सॅमसंगच्या गॅलेक्सी झेड फोल्ड 7 शी थेट स्पर्धा करेल. सध्या सॅमसंगचा फोल्डेबल फोन उघडल्यास 4.2 मिमी इतका पातळ आहे, आणि ॲपल यापेक्षा कमी जाडीचा फोन सादर करण्याच्या प्रयत्नात आहे. या डिव्हाइसचे बाह्य आवरण टायटॅनियम धातूपासून बनवलं जाईल, ज्यामुळं ते टिकाऊ आणि मजबूत असेल. फोल्डेबल डिव्हाइसेसमध्ये टिकाऊपणा हा महत्त्वाचा मुद्दा असतो.

उत्पादन आणि किंमत
ॲपल १८ ची किंमत सुमारे 2,000 डॉलर (अंदाजे 1,76,000 रुपये) असेल, ज्यामुळे हा ॲपलचा सर्वात महाग स्टँडर्ड आयफोन मॉडेल ठरेल. ही किंमत फोल्डेबल डिस्प्लेच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आणि प्रीमियम फीचरमुळे ठरण्याची शक्यता आहे.

हा फोल्डेबल आयफोन ॲपलच्या तीन वर्षांच्या आयफोन रिडिझाइन योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. ही योजना आयफोन 17 मालिकेपासून सुरू झाली असून 2027 मध्ये “आयफोन 20” च्या पूर्णपणे नव्या ग्लास डिझाइनपर्यंत पोहोचेल. आयफोन एअरच्या पातळ डिझाइनसाठी केलेले अभियांत्रिकी प्रयत्न आता फोल्डेबल आयफोनसाठी वापरले जाणार आहेत.

Leave a Reply