Afghan Boy Travel in Planes Landing Gear: कल्पना करा… आकाशात १०,००० फूट उंचीवर, शून्याखालील तापमान, श्वास घ्यायला ऑक्सिजन नाही… आणि तरीही एक १३ वर्षांचा मुलगा मृत्यूला चकवून जिवंत राहतो! अशीच थरारक घटना घडली आहे दिल्ली विमानतळावर.
Crime Story : Insta वरील प्रेमाचा भयानक शेवट! मृतदेह सुटकेसमध्ये भरून काढला सेल्फी!
Navaratri 2025:जगातील एकमेव सीतामाईंचे मंदिर कुठे आहे माहीत आहे का? जिथे अजूनही येते रामायणाची अनुभूती
काबुलहून दिल्लीत जीवघेणा प्रवास
अफगाणिस्तानच्या कुंदुज शहरातील १३ वर्षीय मुलगा प्रवाशांच्या गर्दीतून काबुल विमानतळात शिरला. त्यानंतर तो थेट KAM एअरलाईन्सच्या RQ-4401 फ्लाईटच्या लँडिंग गियरमध्ये लपला. त्याला वाटलं, विमान त्याला इराणला घेऊन जाईल, पण नियतीने त्याला थेट भारतात आणलं.
हा प्रवास तब्बल ९४ मिनिटांचा होता. विमान १०,००० फूट उंचीवर गेलं असताना हवेत ऑक्सिजन नव्हता आणि थंडी हाडं गोठवणारी होती. अशा परिस्थितीतही तो मुलगा चमत्कारिकरीत्या जिवंत राहिला.
दिल्ली विमानतळावर खळबळ
२१ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१० वाजता विमान दिल्लीत उतरलं. सुमारे अर्ध्या तासानंतर हा मुलगा थरथरत बाहेर येताना दिसला.
विमानतळावरील कर्मचारी आणि CISF जवान त्याला पाहून थक्क झाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन इमिग्रेशन विभागाकडे सोपवण्यात आलं.
चौकशीत कळलं की मुलाने विमानाच्या रियर सेंट्रल लँडिंग गियरच्या कप्प्यात लपून प्रवास केला होता.
विमान कंपनीच्या सुरक्षा आणि अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता, लँडिंग गियरच्या भागात एक लाल रंगाचा लहानसा स्पीकर देखील आढळला. यामुळे विमान सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Love Bite करताय? थांबा! यामुळे येऊ शकतो Brain stroke! वाचा सविस्तर
मुलाचं पुढे काय झालं?
चौकशी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या आढाव्यानंतर, त्या मुलाला त्याच दिवशी दुपारी KAM एअरलाईन्सच्या RQ-4402 फ्लाईटने परत काबुलला पाठवण्यात आलं.
