मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी नायिका स्नेहलता वसईकर तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे कायम चर्चेत असते. आत्तापर्यंत तिने केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. कधी नायिकेची तर कधी खलनायिकेची भूमिका तिने साकारली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील सोयराबाईंची भूमिका तर प्रचंड लोकप्रिय झाली.
नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. स्नेहलता सोशल मीडियावर नेहमीच फोटो टाकत असते. नुकतेच तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर काही फोटो टाकले आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने तिने पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये फोटो अपलोड केले आहेत. यावर तिने स्ट्रॅपलेस ब्लाऊज घातला आहे. मूडी बॅकग्राऊंड वरील स्नेहलताचे हे फोटो चाहत्यांना भुरळ घालत आहेत. यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.






