Love Bite करताय? थांबा! यामुळे येऊ शकतो Brain stroke! वाचा सविस्तर

Lifestyle News Trending

Love Relationship tips : प्रेमात असताना आपला जोडीदार गालावर, मानेवर किंवा शरीरावर किस करताना लव्ह बाईट देतो, हे अत्यंत सामान्य मानलं जातं. अनेकांना वाटतं की, हा फक्त प्रेमाचा एक गोड पुरावा आहे. फोरप्ले करताना जोडीदाराला जोरात किस करणं, किस करताना चावणं याला ‘लव्ह बाईट’ (Love bite) म्हणतात. आणि लव्ह बाईट ही खूप कॅज्युअल गोष्ट समजली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, की लव्ह बाईटमुळे काही गंभीर आरोग्यविषयक धोकेही उद्भवू शकतात?

लव्ह बाईट म्हणजे त्वचेवर जोराने किस घेतल्यामुळे तयार झालेली लाल, निळी किंवा जांभळी खूण. यात लहान रक्तवाहिन्या (कॅपिलरी) तुटतात आणि पेटेचिया- रक्ताचे छोटे डाग तयार होतात. काही दिवसांनी त्वचेचा रंग पुन्हा सामान्य होतो. मात्र काही वेळा ही साधी दिसणारी खूण आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Navaratri 2025: राजमाता जिजाऊ साक्षात जगदंबेच्या कन्या! इतिहासात पहिल्यांदाच घडला देवीचा चमत्कार !

Shardiya Navratri 2025: दुर्गादेवी होईल प्रसन्न ! अखंड सुखसमृद्धीसाठी या नवरात्रीत करा ‘हे’ उपाय

लव्ह बाईटमुळे होणारे संभाव्य धोके

१. कॅरोटिड सायनसवरील दबाव

मानेच्या बाजूला कॅरोटिड सायनस नावाचा मज्जातंतू पेशींचा समूह असतो. लव्ह बाईट दरम्यान या भागावर दबाव आल्यास पेशी सक्रिय होतात. याचा थेट परिणाम हृदयावर होऊन हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात किंवा रक्तदाब अचानक घटू शकतो. त्यामुळे चक्कर येणे किंवा खाली पडणे अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

२. स्ट्रोकचा धोका

जर मानेच्या रक्तवाहिन्यांमध्ये आधीच रक्ताची गुठळी (क्लॉट) असेल, तर लव्ह बाईटमुळे ती गुठळी हलून मेंदूकडे सरकू शकते. अशा वेळी मेंदूत रक्तपुरवठा अडखळून स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.

३. रक्तवाहिन्यांचे नुकसान

जोरात किस घेतल्यामुळे मानेतील नाजूक रक्तवाहिन्या फाटू शकतात. यामुळे त्वचेखाली रक्त साचणे, गाठ तयार होणे किंवा रक्ताची गुठळी होण्याचा धोका असतो. काही संवेदनशील व्यक्तींमध्ये हा धोका आणखी गंभीर ठरू शकतो.

लव्ह बाईटशी संबंधित धक्कादायक घटना

२०११ मध्ये न्यूझीलंडमधील एका महिलेला लव्ह बाईटमुळे अर्धांगवायू झाला होता. तपासणीदरम्यान तिच्या मेंदूत रक्ताची गुठळी आढळली आणि तिला तातडीने स्ट्रोकचा उपचार घ्यावा लागला. या घटनेनंतर लव्ह बाईटबाबत सावधगिरीची गरज अधोरेखित करण्यात आली.

लव्ह बाईट हे अनेकदा हानिकारक नसले तरी काही वेळा त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे फक्त रोमँटिक क्षणांचा भाग म्हणून त्याकडे बघू नये, तर आरोग्याच्या दृष्टीनेही जागरूक राहणं महत्त्वाचं आहे.

Leave a Reply