GST 2.0 : सणासुदीला जबरदस्त बचत; जाणून घेऊया कोणत्या वस्तूंवर झाली सर्वाधिक दरकपात…

Lifestyle News Trending

भारतात सोमवारपासून GST म्हणजेच वस्तू आणि सेवा कराचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 22 सप्टेंबर 2025 नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना नवरात्रौस्तवात मनसोक्त खरेदी करता येणार आहे. लागू झालेल्या या द्विस्तरीय कररचनेमुळे जुन्या गुंतागुंतीच्या स्लॅब्सना रामराम ठोकण्यात आला असून एक साधी, पारदर्शक आणि ग्राहकांना दिलासा देणारी रचना आणण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कररचनेला “बचत उत्सव” असे म्हटले आहे. तसेच याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील केले आहे. विशेषत: इलेक्र्टॉनिक्स आणि घरगुती उपकरणांच्या खरेदीदारांसाठी ही मोठी खुशखबर ठरली आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉप या उपकरणांबाबत मात्र, अजूनही संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठीच जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

GST 2.0 अंतर्गत वस्तू आता तीन गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत.
1) 5% कररचना :- धान्य, दूध, औषधे यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर 5 टक्के कर आकारण्यात आला आहे.

2) 18% कररचना :- रेफ्रिजरेटर, टीव्ही, वॉशिंग मशीन, मोबाईल, लॅपटॉप यासह अनेक सामान्य वस्तूंवर 18 टक्के कररचना आकारण्यात आली आहे.

3) 40% कररचना :- महागड्या बाईक, मद्य, शीतपेय यांसारख्या वस्तूंवर 40 टक्के कर लागू करण्यात आला आहे.

फ्रिज, एसी, टीव्ही खरेदीसाठी उत्तम वेळ
या सुधारित रचनेचा सर्वाधिक फायदा मोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीवर दिसून येणार आहे. आधी 28 टक्के जीएसटी असलेल्या फ्रीज, वॉशिंगमशीन, टीव्ही, डिशवॉशर आणि एसीवर आता फक्त 18 टक्के कर आकारला जाणार आहे. यामुळे किमती सुमारे 8 ते 10 टक्क्यांनी घटणार आहेत. उदा. पूर्वी 50 हजार असलेला टीव्ही आता अंदाजे 45 ते 46 हजार रूपयांपर्यंत मिळू शकेल. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही मोठी बचत ठरणार आहे.

स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्ये बदल नाही
मोबाइल फोन आणि लॅपटॉपवरील दरांमध्ये कोणताच फरक जाणवणार नाही. कारण या दोन्ही वस्तू आधीपासूनच 18 टक्के श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतींमध्ये काही बदल होणार नाही. सरकारच्या मते, मोबाइल आणि लॅपटॉप उद्योगाला पीएलआय योजना(Production Linked Incentive) आयात शुल्कातील सूट आणि इतर प्रोत्साहन योजनांमध्ये असल्याने दरकपात करण्याची आवश्यकता वाटली नाही. त्यामुळे या श्रेणीतील ग्राहकांना फक्त ब्रँड्सकडून येणाऱ्या सणासुदीच्या ऑफर्स आणि प्रमोशनल डील्सवर बचतीची संधी मिळेल.

Leave a Reply