नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात Gen-Z तरूणांचा संघर्ष; 14 जणांचा मृत्यू

News

सोमवारी नेपाळची राजधानी काठमांडू येथे हजारोंच्या संख्येने तरूण रस्त्यावर उतरले. सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे सरकारचा निषेध करण्याकरीता 26 वर्षांखालील तरूण पिढी एकत्र येऊन रस्त्यावर उतरले होते. निदर्शनादरम्यान पोलिसांच्या कारवाईत काही तरूण गंभीर जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणानंतर न्यू बानेश्वर परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे.

नेपाळ सरकारने फेसबुक, ट्विटर(X), इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, सिग्नल, वीचॅट यांसारख्या 26 लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्याच्या निर्णय घेतला. या बंदीची अंमलबजावणी सोमवारी सकाळपासून लागू करण्यात आली. या निर्यणयाच्या निषेधार्थ काठमांडू येथील हजारों तरूण रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.

नेपाळ सरकारने ऑनलाइन वर्तनावर देखरेख ठेवण्यासाठी नव्या कायद्यांतर्गत या अॅप्सच्या मदतीने वापरकर्त्यांची माहिती उपलब्ध करून द्यावी असा आदेश देण्यात आला होता. मात्र सदर कंपन्यांनी असे करण्यास नकार दिल्यानंतर, अॅप्सवर पाच दिवसांपूर्वीचं बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारच्या या निर्णयामुळे युवक भडकलेले पाहावयास मिळाले. त्यांनी केवळ सोशल मीडिया बॅनचाच नाही, तर भ्रष्टाचार व सत्तेच्या दडपशाही वृत्तीचाही निषेध केला. संतप्त जमावाने नेपाळच्या संसदेच्या दिशेनं मोर्चा काढला. तरूण जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुर आणि पाण्याच्या तोफेचा ही वापर करण्यात आला. या सगळ्यानंतर देखील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आंदोलनाला हिंसक वळण आले.

आंदोलन हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी गोळीबाराला सुरूवात केली. यानंतर आंदोलक अधिक भडकले. यामध्ये काही तरूणांना गंभीर दुखापत झाली. काठमांडू पोस्टने दिलेल्या अहवालानुसार, 14 युवकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती अधिक बिघडल्याचे लक्षात येताच, काठमांडू जिल्हा प्रशासनाने न्यू बानेश्वर आणि आसपासच्या भागात कर्फ्यू लागू केला आहे. तर संसद परिसरात सैन्य तैन्यात करण्यात आले आहे.

तेथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, पोलिसांनी आंदोलकांना घाबरविण्याकरीता गोळीबार केला. माझ्या मागे उभ्या असलेल्या माझ्या मित्राला गोळी हातात गोळी लागली. गोळीबार अजूनही सुरू असून संसदेच्या आतूनही गोळीबाराचा आवाज येत होता. बाहेरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मित्राला डोक्यात गोळी लागल्याचे ही त्याने सांगितले. पोलिस गुडघ्यांपेक्षा वर लक्ष्य करून अंदाधुंद गोळीबार करत असल्याचे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

सर्व सोशल मीडिया अॅप, साईट्सवर बंदी घालण्यात आली असल्याने नेपाळ मधील तरूणाई टिकटॉकच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

Leave a Reply