Fetus in Fetu rare case in india

Fetus in fetu : नवजात मुलीच्या पोटात आढळले दोन गर्भ !भारतात घडली जगातील दुर्मीळ घटना

News Trending

Infant born with 2 babies in abdomen : एका महिलेच्या पोटात एक बाळ आणि त्या बाळाच्या पोटात २ बाळं वाढत असल्याची दुर्मिळातील दुर्मीळ घटना भारतात घडली आहे. गुरुग्राममधील एका महिलेने एका मुलीला जन्म दिला. पण त्या मुलीच्या पोटात आधीपासूनच २ बाळं वाढत असल्याचे डॉक्टरना दिसले आहे. संपूर्ण जगात घडलेली ही ३० वी घटना आहे. गुरुग्राममधील डॉक्टरांनी एका महिन्याच्या लहान मुलीच्या पोटात वाढत असलेले एक नव्हे, तर दोन गर्भ यशस्वीरीत्या बाहेर काढले आहेत. पाच लाख जन्मलेल्या बाळांमध्ये एकाला हा आजार असू शकतो, पण तेही दुर्मीळ असल्याचे डॉक्टरनी सांगितलं.

काय आहे घटना ?

गुरुग्राममध्ये एका महिलेने एका लहान बाळाला जन्म दिला. पण बाळाचे फुगलेले पोट, सतत करत असलेली चिडचिड करीत आणि दूध पित नसल्यामुळे पालकांना काळजी वाटू लागली. त्यांनी बाळाला तातडीने रुग्णालयात नेले. तिथे केलेल्या तपासणीत बाळाच्या पोटात एकाच पिशवीत (sac) दोन अविकसित बाळं होती. या स्थितीला ‘फेटस इन फेटू’ म्हणतात.

‘फेटस इन फेटू’ म्हणजे नेमकं काय?

‘फेटस इन फेटू’ (fetus in fetu) ही एक अत्यंत दुर्मीळ स्थिती आहे. बाळाच्या शरीरात अविकसित गर्भ तयार होतो, तेव्हा ही स्थिती निर्माण होते.
सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एक जुळा गर्भ काही अडचणींमुळे वाढत नाही, तेव्हा तो दुसऱ्या बाळाच्या पोटात जातो आणि बाळाच्या शरीरात वाढू लागतो. हा गर्भ जिवंत नसतो; मात्र असे असले तरी तो बाळाकडून पोषण घेऊन वाढत राहतो. बाळाच्या पोटामध्ये एका गाठीच्या रूपात हा गर्भ दिसून येतो.
गर्भ हळूहळू विकृत पेशींच्या एका गाठीत बदलतो. कधी कधी त्यात हाडे किंवा अवयवांचे अंशही दिसू शकतात; पण हा गर्भ कधीही एका सामान्य बाळासारखा विकसित होऊ शकत नाही.
म्हणजेच या प्रकरणात ही महिला तिळ्या मुलांसह गर्भवती होती आणि त्यापैकी दोन गर्भ त्या एका बाळाच्या पोटात वाढू लागले होते.

कसा वाचवला बाळाचा जीव ?

एका महिन्याच्या बाळावर शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असते. त्यामुळे डॉक्टरांना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागली. शस्त्रक्रियेपूर्वी बाळाला स्थिर करणे आवश्यक होते. बाळात पाण्याचे प्रमाण काही होते आणि बाळ कुपोषित होते. त्यामुळे बाळाची प्रकृती सुधारेपर्यंत शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. दोन दिवसांच्या तयारीनंतर बालरोग शस्त्रक्रिया आणि ॲनेस्थेशियामधील (भूलतज्ज्ञ) तज्ज्ञांसह सुमारे १५ विशेषज्ञांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आणि दोन गर्भांना बाहेर काढले.
आता हे बाळ पूर्णतः बरे असून त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे

Leave a Reply