पार्टनरचे प्रायव्हेट फोटो केले लिक; 32 हजार पुरूषांच्या “Mia Moglie” फेसबुक ग्रुपने उडवली झोप!

News Trending

फेसबुक हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर अनेक गोष्टी करता येतात. काही जण यावर आपला व्यवसाय करत आहेत. तर काही आपले विचार मुक्तपणे मांडतात. काही आपले कौशल्य दाखवतात, तर काही आपले जुने मित्र-मैत्रिण यांच्याशी संपर्क साधण्यासाठी याचा वापर करतात. फेसबुकचा जितका चांगला वापर केला जातो, तितकाच वाईट वापरही केला जातो. याचे ताजे उदाहरण म्हणजे पोलिसांना फेसबुकवरील अशा एका ग्रुपची माहिती मिळाली ज्या ग्रुपवर काही पुरूष आपल्या बायकोचे, गर्लफ्रेंडचे प्रायव्हेट फोटो शेअर करत होते.

या ग्रुपवर हजारो पुरूष आपली बायको, गर्लफ्रेंड किंवा काही जण अपरिचित महिलांची परवानगी न घेता त्यांचे खासगी फोटो शेअर करत होते. 2019 मध्ये सुरू झालेल्या या ग्रुपचे नाव “Mia Moglie” (मिया मोलिए) म्हणजेच ‘माझी पत्नी’ असे होते. तसेच यामध्ये तब्बल 32,000 हजार पुरूष सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या ग्रुपमध्ये प्रामुख्याने महिलांचे कपडे बदलताना, अंघोळ करताना, तर काहीजण शारिरीक संबंध ठेवतानाचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे हे फोटो त्या महिलांचे पती किंवा बॉयफ्रेंडचं अपलोड करत असल्याचे तपासात समजले. यामध्ये अश्लील प्रतिक्रिया आणि प्रस्ताव मिळवण्याच्या उद्देशाने हे फोटो शेअर केले जात होते.

सर्वात धक्कादायक म्हणजे काही पुरूषांनी आपल्या पार्टनरचे फोटो पैंशासाठी विक्री करत असल्याचे समजले. एका पोस्टमध्ये तर महिलेचे वय, वजन, स्तनांचा आकार आणि किती लैंगिक जोडीदार होते याची माहिती दिली होती. काहींनी तिच्या शरीराचे कौतुक केले, तर काहींनी अश्लील टिप्पण्या केल्या होत्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर घटना इटलीमधील असली तरी सोशल मीडियामुळे ही बातमी वाऱ्यासारखी जगभर परसली आहे. मिया मोलिए सुरू झाल्यापासून, मेटा आणि इटालियन सायबर गुन्हे तपास अधिकाऱ्यांकडे 2000 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर इटलीमध्ये खळबळ उडाली. तेथील एका पोलिस अधिकाऱ्याने ‘माझ्या करिअरमध्ये मी सोशल मीडियावर इतके घृणास्पद कृत्य पाहिले नव्हते’ असे म्हटले आहे.

या ग्रुप बद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्यानंतर हा ग्रुप बंद करण्याची मागणी सुरू झाली. यामध्ये गुन्ह्यांमध्ये बदनामीपासून ते परवानगीशिवाय खासगी माहिती शेअर केली आहे. आमच्या कार्यालयाने हे पेज बंद करण्याकरीता दिवस-रात्र काम केले आहे. ही अतिशय गंभीर बाब असल्याचे पोलिसांच्या उपसंचालिका बार्बरा स्ट्रापाटो यांनी सांगितले. चौकशी आणि तपासानंतर अखेर 20 ऑगस्ट 2025 रोजी हा ग्रुप बंद करण्यामध्ये पोलिसांना यश मिळाले.

ग्रुप बंद होण्यापूर्वी ग्रुपचा अज्ञात अॅडमिनने शेवटची पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये “आम्ही नुकताच एक नवीन खासगी आणि सुरक्षित ग्रुप केला आहे. गुडबाय आणि मॉरलिस्ट्सनी दूर राहा.” असे लिहिले होते. पोलिसांनी हा नवा ग्रुप टेलिग्रामवर तयार केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर इटलीतील स्त्रीवादी कार्यकर्ते, संस्था जागरूत झाले असून, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या घटना थांबवल्या पाहिजेत यासाठी पुन्हा पोलिसांकडे तक्रार केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियावर आणखी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. डिजिटल जगातील हा प्रकार फक्त इटलीपुरता मर्यादित नसून, जागतिक स्तरावर महिलांच्या गोपनीयतेला धोका निर्माण करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply