मेष-
संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्याच्या स्वभावामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. जोडीदारासाठी खास बेत आखाल.
वृषभ-
मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी सहकार्य लाभेल. स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. संपत्ती विषयक बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल.
मिथुन-
कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायातील निष्काळजीपणा तुम्हाला नुकसान पोहचवू शकते. मिंत्रासमवेत आनंदी क्षण अनुभवाल. वैवाहिक आयुष्यात आनंदी आनंद असेल.
कर्क-
ज्ञानलालसेपोटी नवे मित्र जोडाल. जोडीदारासोबत शुल्लक कारणावरून वाद होण्याची शक्यता. कल्पक गोष्टींकडे अधिक कल राहिल. अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल.
सिंह-
तुमच्या कामाची आज स्तुती होईल. संपूर्ण दिवस उत्साहवर्धक असेल. गरजूंची मदत करून आनंद अनुभवाल. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत.
कन्या-
गुंतवणूकीमध्ये चांगला परतावा मिळेल. मानसिक शांतता लाभेल. तुमच्या दानशूर स्वभावामुळे तुमचे कौतुक होईल. नवीन संकल्पनांचा लाभ घ्याल.
तूळ-
स्वत:ला वेळ द्याल. दीर्घकाळ प्रलंबित असलेली थकबाकी प्राप्त होईल. प्रिय व्यक्ती सोबत वेळ घालवाल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील.
वृश्चिक-
धनसंचय कसा करावा याचे कौशल्य शिकून घ्याल. मुलांसमवेत वेळ घालवाल. वाहने चालवताना सावधानता बाळगा. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
धनु-
थोडी मौज मजा केल्यास ताण विसरण्यास मदत होईल. धन लाभ होण्याची दाट शक्यता. परदेशात जाण्यासाठी प्रयत्नात असलेल्यांना यश मिळेल.
मकर-
सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता. करीअरमध्ये नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर कराल.
कुंभ-
भीती, चिंता सुखी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. नवा स्त्रोत मिळेल. दागदागिन्यांची खरेदी कराल. दिवसाचा उत्तरार्ध आरामात जाईल. नवीन प्रकल्प राबवण्यासाठी उत्तम दिवस.
मीन-
धन लाभ होण्याची शक्यता. धनलाभामुळे बऱ्याच समस्या मार्गी लागतील. हृदयविकाराच्या रूग्णांनी कॉफी प्राशन करणे सोडावे. समाजात तुमचे कौतुक होईल.
