Ladki Soon Abhiyan: हुंडाबळीला आळा! शिंदेंची गर्जना – ‘लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन’

News

गेल्या काही वर्षांपासून राज्यात कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. नुकतेच पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने या प्रश्नाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (NCRB) अहवालानुसार, महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “लाडकी सून” नावाचं विशेष अभियान सुरू केलं आहे.

या अभियानाचा मुख्य उद्देश – राज्यातील सुनांवर होणाऱ्या छळ, अन्याय आणि कौटुंबिक हिंसाचाराला आळा घालणे. पीडित महिलांना त्वरित मदत मिळावी यासाठी खास हेल्पलाईन क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांचा ठाम संदेश
आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची माहिती दिली. ते म्हणाले –
“महाराष्ट्रातील लेकी-सुना सुरक्षित राहिल्या, तर महाराष्ट्रही सुरक्षित राहील. प्रत्येक घरातील सून ही माझी लाडकी बहीण आहे. अशा लाडक्या बहिणींचा छळ करणारी वृत्ती समाजासाठी कलंक आहे. आता अशा अत्याचाऱ्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल.”

शिंदे यांनी स्पष्ट केलं की, ‘लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन’ असेल. यापुढे प्रत्येक शिवसेना शाखा सुनांसाठी माहेरघर म्हणून काम करेल.

हेल्पलाईनची सोय
महिलांच्या मदतीसाठी शिवसेना गटाकडून दोन हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत –
📞 8828862288/8828892288

पीडित महिला या क्रमांकावर कॉल करून आपली समस्या मांडू शकतात. शिंदे म्हणाले की –
“तुमच्या एका फोननंतर शिवसेनेच्या रणरागिणी तुमच्या मदतीला धावून येतील. गरज पडल्यास कायदेशीर मदतही दिली जाईल. छळ करणाऱ्यांना आधी समजावलं जाईल, पण सुधारणा न झाल्यास पुढची पावलं आमच्या रणरागिणींना माहीत आहेत.”

महिलांच्या सन्मानासाठी संकल्पया अभियानाला सुरुवात करताना एकनाथ शिंदे यांनी कविता म्हणत महिलांच्या सामर्थ्याला वंदन केलं –

“नारी शक्ति है, सम्मान है,
नारी गौरव है, अभिमान है,
नारी के सम्मान के खातिर
एक कदम हमने बढ़ाया है…”

त्यांनी आवाहन केलं की, महाराष्ट्रातील प्रत्येक सुन सुरक्षित राहील, हा संकल्प सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण करूया.

Leave a Reply