Journey of Lux soap :कपडे धुण्याचा साबण ‘लक्स’ कसा झाला ?

Lifestyle News

तुम्ही कधी ऑबझर्व्ह केलंय का?
साबण म्हटलं की, आईसाठी संतूर, डॉक्टरांसाठी डेटॉल आणि टूथपेस्ट विचारताना आपण अजूनही म्हणतो कोलगेट आहे का?
काही ब्रँड्स इतके मोठे होतात की ते फक्त प्रॉडक्ट नसतात… ते एक माईलस्टोन ठरतात!
असाच एक ब्रँड म्हणजे लक्स साबण!…

एक काळ असा होता की, लक्स साबण घरात असणं म्हणजे श्रीमंतीच लक्षण मानलं जातं. पण भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी पासून लक्स साबण घरोघरी वापरला जायचा हे तुम्हाला माहित आहे का? तोही कपड्याचा साबण म्हणून ? नाही ना! जाणून घेऊया मध्यमवर्गीयांच्या लक्झरीयस साबणाची लक्स गोष्ट…

सगळ्या दुकानांमध्ये एक साबण नक्की मिळतो तो म्हणजे लक्स. त्याचा सुगंध, रंग आणि डिझाईन मिडल क्लास वर्गाला लक्झरियस वाटते. ७ दशकांहून अधिक काळ या साबणाने आपले बस्तान मार्केट मध्ये बसवलेलं आहे.
लक्सचा प्रवास सुरु झाला तो टॉयलेट सोब म्हणून.. . विल्यम लिव्हर आणि जेम्स डोर्सी लिव्हर या भावांनी मिळून १८८५ मध्ये साबण बनवणारी लिव्हर ब्रदर्स नावाची कंपनी सुरु केली. हीच कंपनी पुढे युनिलिव्हर म्हणून ओळखली जाते.

या कंपनीने सुरुवातीला कपडे धुण्यासाठीच्या साबणाची निर्मिती केली. पण मार्केटमधली चर्चा ऐकल्यावर त्यांना कळलं की, बायका हा साबण कपड्यांऐवजी अंघोळीसाठी वापरतात. हीच सुवर्णसंधी समजून या भावांनी या साबणामध्ये ग्लिसरीन, पाम ऑइल मिक्स करून चकाचक साबण बाजारात आणला.

आधी या साबणाला ‘हनी’ नाव दिलेलं. नंतर सनलाईट दिलं. पण हे नाव फारकाळ टिकलं नाही. लोकांना आपलंस वाटेल, लाईफस्टाईलला सूट होईल असं लक्झरी वरून लक्स हे नाव देण्यात आलं.

लक्स साबण भारतात आला १९२५ रोजी. तेव्हा स्वदेशी वस्तूंची चळवळ चालू असल्यामुळे त्यांना आपलं बस्तान बसवण्यासाठी १९५० चा काळ उजाडला. १९५० मध्ये मधुबालाने या साबणाची जाहिरात केली होती, श्रीमंतांच्या चैनीच्या वस्तू मध्यम वर्गीयांना परवडणाऱ्या किमतीत ही थीम ठरवून त्यांनी बाजारात आपली जागा तयार केली, त्यानंतर जवळजवळ ७० दशकं हा साबण ‘ब्रँड’ ठरलेला आहे. ५० पेक्षा अधिक बॉलिवूड कलाकारांनी या साबणाची जाहिरात केलेली आहे. आता या साबणाचे बॉडी वॉश , परफ्यूम्स, लिक्विड जेल बाजारात उपलब्ध आहेत. आजही टॉप ५ साबणांमध्ये लक्स चं नाव घेतलं जातं.
तुम्हाला कोणत्या साबणाच्या निर्मितीची गोष्ट ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून सांगा…

Leave a Reply