स्वातंत्र्य दिन म्हटला की आपल्याला तिरंगा आठवतो… पण भारताचा पहिला ध्वज तिरंगा नव्हता, हे तुम्हाला माहीत आहे का? भारताच्या ध्वजाचा प्रवास खूप रोचक आहे. जाणून घेऊया हा इतिहास.
7 ऑगस्ट, 1906 रोजी कोलकात्यात सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी पहिल्यांदा भारताचा झेंडा फडकावला. त्यावर हिरवा, पिवळा, लाल असे तीन रंग होते, आणि मध्ये आठ कमळांची फुले ! म्हणून त्याला ‘लोटस फ्लॅग’ म्हणत.
22 ऑगस्ट, 1907 रोजी पॅरिसमध्ये मादाम कामा यांनी परदेशात पहिल्यांदा भारताचा झेंडा फडकावला. त्यावर ‘वंदे मातरम’ लिहिलेलं होतं, आणि तो भारताच्या स्वातंत्र्याचा संदेश जगभर पोहोचवणारा क्षण ठरला.
1917 मध्ये लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) आणि ऍनी बेझंट (Annie Besant) यांनी होम रुल चळवळीच्या दरम्यान सप्तर्षी असणारे सात तारे, कोपऱ्यात चंद्र-चांदणी असलेला हिरव्या-लाल रंगाचा झेंडा फडकवला होता.
1921 मध्ये पिंगली वेंकैया (Pingali Venkayya) यांनी तिरंग्याचा आराखडा मांडला, ज्यात सुरुवातीला फक्त लाल आणि हिरवा रंग होता, नंतर महात्मा गांधींच्या सूचनेनुसार पांढरा रंग आणि आणि चरखा जोडण्यात आला.
1931 मध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा हे तीन रंग आणि मध्यभागी चरखा असणारा ध्वज महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात सादर करण्यात आला. पण अंतिमतः 22 जुलै 1947 संविधानसभेने आजचा तिरंगा जो पिंगली वेंकैया यांनी तयार केला आहे तो अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारला. 15 ऑगस्टला तो पहिल्यांदा लाल किल्ल्यावर अधिकृतरित्या फडकवण्यात आला.
सर्व भारतीयांसाठी हा आनंदाचा क्षण होता. आजचा तिरंगा केवळ झेंडा नाही… तो आपल्या स्वातंत्र्याचा, त्यागाचा आणि एकतेचं प्रतीक आहे. त्यामुळे त्याचा अभिमान आणि सन्मान राखून स्वातंत्र्य दिन (Indian Independence Day) साजरा करूया ! जय हिंद
