सालाबाद प्रमाणे यंदा देखील बॉलिवूडचे भाईजान सलमान खान यांचा रियॅलिटी शो बिग बॉसचा 19 वा सीझन लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येत आहे. 24 ऑगस्ट पासून कलर्स आणि जिओ हॉटस्टारवर याचे प्रक्षेपण होणार आहे. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी वेगळेपण असते. यंदा देखील असेच वेगळेपण दिसणार आहे, काही दिवसांपूर्वीच सलमान खानने शेअर केलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
बिग बॉस 19 सीझनची घोषणा झाल्यापासून यंदा कोणते स्पर्धक दिसणार याची चर्चा सुरू आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी अनेक सेलिब्रिटी आणि मोठ्या नावांची चर्चा सुरू आहे. या सीझनमध्ये कोणतेही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स नसतील.
या सीझनची घोषणा झाल्यानंतर अनेक नावांची चर्चा झाली पण सर्वांच लक्ष वेधलं ते हिंमाशी नरवाल यांच्या नावाने. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या विनय नरवाल यांच्या त्या पत्नी आहेत. 19 व्या सीझन हिमांशी नरवाल यांना शोची ऑफर मिळाल्याची माहिती “टेली चक्कर” या वृत्तसंस्थेने दिली. बिग बॉसचे निर्माते हिमांशीला शोमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हिमांशीला शोमध्ये आणण्या मागे तिची गोष्ट भावनिकदृष्ट्या प्रेक्षकांना शोसोबत जास्त कनेक्ट करेल असे निर्मात्यांचे मत आहे. निर्माते अशा काही लोकांच्या शोधात आहेत, जे प्रेक्षकांना जास्त भावतील. पण बिग बॉसच्या ऑफरला हिमांशी यांनी होकार दिला की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सर्वांची मन जिंकणारा सदस्य अभिजीत सावंत हा देखील हिंदी बिग बॉसमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. अभिजीत सोबत आणखी एका सदस्याला कलर्सकडून विचारणा झाली आहे, पण दुसरा स्पर्धक कोण, याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही.
यासोबतच बिग बॉस 19 मध्ये सहभागी होणाऱ्या काही संभाव्य स्पर्धकांची यादी समोर आली आहे. यामध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दोघांची नावे समोर आली आहेत. त्यापैकी सोधी म्हणजेच गुरूचरण सिंग आणि शैलेश लोढा यांचा समावेश आहे. तर गेल्या काही महिन्यांमध्ये तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेली “द रेबेल किड” अपूर्वा मुखिजा हि देखील दिसणार आहे.
