8th Pay Commission
खाजगी नोकरदार असो नाहीतर सरकारी, पगारवाढीची वाट सगळेच बघतात कारण महिन्याच्या शेवटी प्रत्येकालाच चणचण जाणवते. पण आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारने आठव्या आयोगाचं गिफ्ट दिलंय. ज्यामुळे सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांच्या वेतन आणि निवृत्तीवेतनामध्ये वाढ होणार आहे.
याच्याआधीचा म्हणजे सातवा वेतन आयोग हा २०१६ साली लागू करण्यात आला होता. ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मोठी सुधारणा झाली होती. बेसिक पे 2.57 पट वाढवण्यात आला होता, तर महागाई भत्ता (DA) आणि गृहभाडे भत्ता (HRA) यामध्येही लक्षणीय वाढ झालेली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याला मोठा हातभार लागला होता.
त्यानंतर सर्वच जण या आठव्या वेतन आयोगाची वाट बघत होते. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावेल. नवीन पगाररचना कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य मिळवून देईल. याशिवाय, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची कामगिरी आणि समाधान वाढण्याची शक्यता आहे. हा विश्वास सर्वाना होता. आणि आता तो आठवा वेतन आयोग लागू झाला आहे.
या आठव्या वेतन आयोगाच्या recommendation नुसार Basic Payment हे १८००० रुपयांवरून थेट ३४,५०० रुपये होणार आहे. या पगार वाढीमुळे लोकांना घर, शिक्षण आणि आरोग्य या संदर्भात ज्या आर्थिक अडचणी यायच्या त्या कमी होतील, त्यामुळे ही पगार वाढ अनेकांसाठी नक्कीच दिलासादायक असणार आहे. या आठव्या वेतन आयोगाचे इतके सगळे फायदे असले तरीही ही पगारवाढ काही लगेच होणार नाहीये. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबद्दल अधिकृत अधिसूचना आणि तपशीलवार माहिती लवकरच जाहीर केली जाईल आणि त्यानंतर म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून त्याची अंमलबजावणी होईल असं सरकार कडून सांगण्यात आलं आहे. तुम्हाला सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…
दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…
वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…