71st National Film Awards 2025 Winners : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदा १ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. २३ सप्टेंबर रोजी या सर्व विजेत्यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
I phone 17 घेताय? थांबा! ‘हे’ वाचा आणि ठरवा
कलाकार व तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. भारतात १९५४ पासून राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली होती. यंदा शाहरुख खानला तब्बल ३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रांत मॅसी आणि शाहरुख खान यांना विभागून देण्यात आला आहे. राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. यासह यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला आहे.
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘द केरला स्टोरी’ सिनेमासाठी सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ३३ वर्षांच्या कारकिर्दीत शाहरुख खानला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
विक्रांत मॅसीला 12th Fail सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार शाहरुख आणि विक्रांत यांना विभागून देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या सिनेमासाठी प्रदान करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार विजयराघवन ( पूक्कलम ) आणि मुथुपेटाई सोमू भास्कर ( पार्किंग ) यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार उर्वशी ( उल्लोझुक्कू ) आणि जानकी बोडीवाला ( वश ) यांना विभागून देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार कबीर खंडारे ( जिप्सी ), त्रिशा ठोसर ( नाळ २ ) आणि श्रीनिवास पोकळे ( नाळ २ ) यांना देण्यात आला.
