Independence Day: 18 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन? वाचा सविस्तर

News

भारताचा स्वातंत्र्य दिन भारतातीलच काही भागांमध्ये 18 ऑगस्टला साजरा केला जातो. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे..

ही गोष्ट आहे 1947 च्या फाळणीनंतरची (1947 Partition)… ब्रिटिश वकील व्हिस्काउंट सिरिल रॅडक्लिफ यांनी भारत-पाकिस्तान सीमा निश्चित केल्या. सुरुवातीच्या मॅपनुसार पश्चिम बंगालमधील नादिया आणि मुर्शिदाबादचे हिंदू मेजॉरिटी असणारे भाग पूर्व पाकिस्तानात गेलेले.

पण नादियातील लोकांना भारतातच राहायचं होतं.

त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि थेट व्हाइसरॉय माउंटबॅटन (Lord Mountbatten) यांना लेटर पाठवलं.

आणि 17 ऑगस्ट, 1947 च्या संध्याकाळी, भारतातील काही जिल्ह्यांची अदलाबदल होणार आहे अशी ऑल इंडिया रेडिओ (All India Radio) वर घोषणा करण्यात आली. त्यानुसार नादिया हे स्वतंत्र भारतात परत समाविष्ट करण्यात आले.

दुसऱ्याच दिवशी, 18 ऑगस्टला, कृष्णनगरच्या जिल्हा मुख्यालयात लावलेला पाकिस्तानचा झेंडा उतरवून भारतीय तिरंगा फडकवण्यात आला!

अर्थात काही काळाने या भागात 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन अधिकृतरित्या साजरा करण्यात येऊ लागला.

पण 1991 मध्ये, इतिहासकार अंजन सुकुल यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडे 18 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची परवानगी मागितली.

आणि 18 ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्य दिन’ पुन्हा साजरा करण्यास सुरुवात झाली.

18 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त या जिल्ह्यात मिरवणुका, भांगडा नृत्य, डॉग शो, आणि चूर्णी नदीवर बोट रेसिंग असे कार्यक्रम तिथे आयोजित केले जातात.

Leave a Reply