Trending

इतकी आग…. इतकं नुकसान…

लॉस एंजिलीस मधील वणव्याचे रील्स, WhatsApp videos एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच, पण नेमकं हे सगळ काय चालू आहे? आणि याची सुरवात कुठून झाली?

जंगलामध्ये पसरलेली ही आग मंगळवारी 7 जानेवारी रोजी सकाळी सर्वांत आधी पॅसिफीक पॅलिसेड्समधून सुरू झाली. हा परिसर लॉस एंजेलिसच्या वायव्य भागात येतो. 

मात्र फक्त १० एकरच्या परिसरामध्ये लागलेली ही आग काही तासांमध्येच 2900 एकरच्या परिसरामध्ये पसरली.  “एखादा बॉम्ब शहरावर पडलाय असं वाटतंय या शब्दात येथील अधिकाऱ्यांनी या आगेचं वर्णन केलं आहे. या आगेला आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू असले तरीही आग आटोक्यात आणता आलेली नाही.  आत्तापर्यंत अंदाजे १५ पेक्षा जास्त लोकांचा  या आगेत मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांना बेघर व्हावं लागलेलं आहे. 

कॅलीफोर्निया सारख्या अतिशय सुंदर राज्यातील अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू समजला जाणारा हा भाग आणि येथील महागडी घरं काही क्षणात बेचिराख झाली आहेत. या वणव्यात आत्तापर्यंत २५० ते २७५ अब्ज डॉलरचं नुकसान झालेलं आहे. जोरदार वाहणारं वारं आणि कोरड्या वातावरणामुळे मदत आणि बचाव कार्यातही बऱ्याच अडचणी येत आहेत. बहुतांश ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवणं जवळपास अशक्य झालं आहे.

आग विझवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अग्निशमन दलाला अतिरिक्त उपकरणं उपलब्ध करून देण्याच्या सूचना राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन लष्कराला दिल्या आहेत.

राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, “या आगीला सामोरं जाण्याकरिता आम्ही काहीही करण्यासाठी तयार आहोत. लोकांचं आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल. मात्र, त्यासाठी थोडा अधिक वेळ लागेल. आम्ही हे काम करत आहोत.”

“आग विझवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अग्निशमन दलालाही आता पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. लोकांना पाणी वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आग विझवण्यासाठी पाण्याचा अतिवापर करण्यात आल्यास लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो.”

ही आग आता कॅलिफोर्नियामधून हॉलिवूड हिल्सपर्यंत पसरली आहे. हॉलिवूडमधील अनेक फिल्म स्टार्सची घरेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नेस्तनाबूत झाली आहेत. hollywood चं जगप्रसिद्ध sign सुद्धा या आगेपासून वाचू शकलेलं नाहीये.

इतक्या मोठ्या प्रमाणात ही आग का पसरली याचा अनेक जण अभ्यास करत आहेत तरी वरकरणी जोरदार वाहणारी हवा आणि पावसाचा अभाव या दोन मुख्य कारणांमुळे हा वणवा इतक्या मोठ्या प्रमाणात भडकल्याचं सांगितलं जात आहे. याच्यासोबतच जागतिक तापमान वाढीचा परिणाम देखील या घटनेवर दिसून आला आहे. 

आग वणवा पेटून आता जवळ जवळ दहा दिवस ओलांडले असूनही आग आटोक्यात न आल्याने सर्वत्र चिंतेचं वातवरण आहे. ही आग कधी आटोक्यात येईल याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून आहे.

Admin

Recent Posts

“मूलांना जन्म द्या सबसिडी मिळवा” चीनचे नवे धोरण

चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…

3 days ago

Malegaon Blast: 17 वर्षांनंतर अखेर भगवाचं जिकंला! स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…

3 days ago

ट्रम्प यांनी भारतावर लादले कठोर टॅरिफ! रशियासोबत व्यवहाराचा फटका?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…

3 days ago

Mahadevi Elephant : महादेवीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर; गावकऱ्यांचा हत्तीणीला निरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…

5 days ago

जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर? नेमकं काय घडलं… वाचा सविस्तर

दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…

5 days ago

UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी – 1 ऑगस्टपासून व्यवहारामध्ये नवे बदल

वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…

6 days ago